मुंबई:बॉम्बे लिक्स चे पत्रकार शाहिद अन्सारीच्या समर्थनार्थ आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावत घेतली। मुख्यमंत्र्यांनी भेटीनंतर सामाजिक माध्यमातून शाहिद विरोधात अफवाह पसरवणाऱ्यांचा प्रयत्न गंभीर असल्याचं सांगत सायबर सेलच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे अश्वासीत केले. शाहिद विरोधात धार्मिक भावना भडकवण्याचा गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल केल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं व स्वतः या विषयात लक्ष घालणार असल्याचा शब्द दिला. या शिष्ठमंडळात कमलेश सुतार, आज तक डेप्युटी एडिटर; एहसान अब्बास, झी न्यूजचे पॉलिटिकल हेड; ऋत्विक भालेकर, एबीपी न्यूज; वसीम अन्सारी, ई टीव्ही; तुषार शेटे, टीव्ही 9; अविनाश पांडे, न्यूज 24; राहुल शर्मा, लाईव्ह इंडिया; राझिक खान, एएनआई आणि अन्य पत्रकार सहभागी होते. एबीपी न्यूजचे मयूर पारीख, जय महाराष्ट्रचे विलास आठवले आणि एनडीटीव्हीचे प्रसाद काथे या वरिष्ठ पत्रकारांनी शाहिदशी संपर्क साधून या प्रकरणाचा पाठपुरावा केला।
Post View : 8





























